२०१७ मधील काही 'ठळक' गुंतवणूक
मी साधीसुधी नोकरी करून अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करणारा पंचविशीतील विद्यार्थी. त्यामुळे खिसा बारमाही वाहता नसतो. पण रद्दीची दुकानं यासाठी अपवाद असतात. खिशात एक शंभरची नोट असली तरी काम चालून जातं. कारण तिथं शंभर रुपयात तीन-चार हजाराचं पुस्तकं मिळून जातं. हो, तीन-चार हजाराचं, तर कधी त्याहून अधिक किमतीचं. २०१७ या वर्षात अशी काही पुस्तकं मला मिळाली की, सहजासहजी त्यावर माझाही विश्वास बसला नाही.......